भारतीयांसाठी कॉलरा आणि प्लेगवर लस शोधणारा महान शास्त्रज्ञ डॉ. हाफकीन

The great scientist who invented the vaccine against cholera and plague for Indians- Dr. Halfkin

सध्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन लसी बाजार पेठेत उपलब्ध आहेत. भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्स आणि लंडनच्या ऑक्सफर्डमध्ये विकसीत झालेली आणि पुण्याच्या सीरम इन्सटीट्यूटमध्ये (Serum Institute) बनलेली कोव्हीडशील्ड. लसींच्या वापराबद्दल जनतेच्या मनात संभ्रम आहेत. अनेक प्रश्नही आहेत. मधल्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुनही लस घेण्यास नकार दिला होता. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) यावर उपाय म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समोपदेशनाला सुरुवात केलीये.

कोरोनाच्या लसीबद्दल आजच्या काळात इतका संभ्रम असेल तर विचार करा शंभर वर्षापूर्वी प्लेगच्या लसीबद्दल किती अनास्था जनतेच्या मनात असेल. ती दूर करण्यासाठी लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने स्वतःवर लसीचा पहिला प्रयोग केला होता.

१८६०ला युक्रेनच्या ज्यू कुटुंबात जन्मलेल्या हॉ. वाल्डेमेर हाफकीन (Dr. Halfkin)यांची ही गोष्ट. त्यांच्या ज्यू असण्याचा विशेष उल्लेख करणं गरजेच आहे कारण त्यावेळी ज्यू लोक प्रचंड त्रासातून जात होते. अनेक संकटांचा त्यांना समाना करावा लागत होता. लोकांच्या द्वेषाला, झुंडशाहीला अनेक ज्यू बळी पडले होते. कित्येकांनी जीव गमावला होता. अशा वातावरणात हाफकिन वाढले. पुढं शिक्षणासाठी युरोपात आले.

कॉलरावर शोधली लस

सुरुवातीच्या काळात त्यांनी जीवाणूंवर संशोधन केलं. शिक्षण पूर्ण करुन ते रशियात पोहचले. पण रशियात राजकीय धामधूम सुरु होती. झारची म्हणजे तिथल्या राजाची हत्या झाल्यावर तिथल्या बुद्धिजीवी लोकांवर मोठ संकट ओढावलं. हाफकीन यांनी स्वीत्झरलँडचा मार्ग धरला. तिथं पोहचल्यावर त्यांनी लई पाश्चर इन्सटीट्यूटमध्ये प्रवेश मिळवला. विद्यार्थी म्हणून नाही तर ग्रंथपाल म्हणून ते तिथं काम करु लागले. त्यावेळी वारंवार येणाऱ्या कॉलराच्या साथीला कारणीभूत जंतूचा त्यांनी शोध लावला. त्यावर लस बनवली. पण ती वापरायची कोणावर हा प्रश्ना होता.

भारतात केले प्रयोग

ही लस कॉलरावर काम करते हे सिद्ध करण्यासाठी त्याला कॉलराची साथ असणाऱ्या देशात जाणं गरजेच होतं त्यावेळी भारतात कॉलराची साथ सुरु होती. तो भारतात आला. कोलकत्यात त्याने लसीच उत्पन्न सुरु केलं कारण तिथं साथ महाभयानक होती. लोकांनी लस घ्यायला सुरुवात केली आणि कॉलरा नियंत्रणात आला. हा काळ होता १८९६/९७चा. तो पर्यंत मुंबईत प्लेगची साथ आली. मरणानं थैमान घातलं. यावर लस शोधण्याची जबाबदारी डॉ. हाफकिन यांनी खांद्यावर घेतली.

ते मुंबईला आले ग्रँट मेडीकल कॉलेजच्या एका कोपऱ्यात प्रयोगशाळा उभारली. अविरत प्रयत्नांनंतर त्यांनी लस बनवली. १८९७च्या पहिल्या आठवड्यात लस तयार झाली पण जुन्या प्रश्नानं नव्यानं डोकं वर काढलं ती कोण घेणार?

डॉ हाफकीन यांनी धाडसी निर्णय घेतला. लस स्वतः टोचून घेण्याचा. त्यांनी लस टोचून घेतली तुरुंगातल्या काही कैद्यांना देण्यात आली. अपवाद वगळता सर्वांना लस लागू पडली.

१९ लोकांच्या मृत्यूसाठी धरलं जबाबदार

प्लेग गावखेड्यातही हाहाकार माजवत होता. डॉ हाफकीन यांची लस सगळीकडे वितरीत करण्यात आली. पण भारतात १९०२ला एका गावात ही लस घेतल्यानंतर १९ जण मरण पावले. चौकशी आयोग नेमण्यात आला. डॉ. हाफकीन यांना दोषी मानण्यात आलं. पण नंतरच्या काळात दुसऱ्या चौकशी आयोगाच्या लक्षात ही बाब आली की हे मृत्यू लसीमुळं नाही तर धनुर्वातामुळं झालेत. हाफकीन यांच्या सहकाऱ्याने योग्य काळजी न घेतल्यामुळं हे मृत्यू झाले होते. १९०७ला ते निर्दोष असल्याचे जाहीर करण्यात आले. नंतर काही काळ त्यांनी कलकत्त्यात राहून संशोधन केलं आणि १९१४ला ते स्वीत्झर्लँडला परतले.

मुंबईतल्या परळ भागात त्यांनी संशोधनासाठी सुरु केलेली प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटचे नामकरण हाफकीन इन्स्टीट्यूट करण्यात आलं. लसींसोबत सर्पदंशावरील औषधेही इथंच बनवली जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER