तो महान भारतीय सम्राट ज्यानं चीनवरही आपला अधिकार गाजवला होता !

Maharashtra Today

कनिष्क प्रथम कुशाण वंशाचा सर्वात महान शासक होता. त्याच्या काळात कुशाण साम्राज्या सर्वाधिक शक्तीशाली साम्राजांपैकी एक होतं. पश्चिम चीनपर्यंत साम्राज्य विस्तार करणारा तो महान योद्धा होता. इतकच नाही तर चीनकडून युरोपात जाणाऱ्या रेशिम मार्गावरही त्याने कब्जा मिळवला होता. आशिया खंडाच्या इतिहासात धर्मस्थापना, कला, साहित्य आणि युद्धतंत्राचा सर्वाधिक विकास त्याच्या काळात झाल्याच्या मान्यता आहेत.

चीनहून भारतात आले होते कुशाण

कुशाण वंशामध्ये कनिष्क सर्वश्रेष्ठ सम्राट (Kanishka was the greatest emperor in the Kushan dynasty)होता. राजकारण आणि सांस्कृतीक विकासासाठी ही त्याच मोलाचं योगदान आहे. भारतात कुजुल कडफिसस यानं कुशाण वंशाची सत्ता प्रस्तापित केली. त्यानं इसवी सन १५ ते इसवी सन ६५ पर्यंत राज्य केलं. कुशाण खऱ्या अर्थानं चीनच्या यु – ची जातीची एक पोटजात होती. दुसऱ्या शतकापर्यंत ते चीनच्य पश्चिममध्ये राहत होते. मौर्य साम्राज्यानंतर भारतात आलेल्या घराण्यांपैकी शक आणि पहलव प्रमाणं कुशाणही एक प्रमुख परदेशी घराणं होतं.

या वंशानं हळूहळू भारतभर विस्तार केला. कनिष्कचा जन्म ही याच घराण्यातला. त्याच्या कार्यकाळात कुशाण साम्राज्यानं मोठी मजल मारली. कनिष्कच्या शासन काळाची सुरुवात ७८ इसवी सणला सुरुवात झाली.

शकांचा आणि पहलवांचा पराभव करुन कुशाणांनी भारताचा मोठा हिस्सा जिंकला. मध्य अशियासह उत्तरभारतातला मोठा भाग त्यांच्या ताब्यात होता.

रेशिम मार्गावर केला कब्जा

कनिष्कच्या कार्यकाळात व्यापार बहरला. कुशाण प्रांतातले व्यापारी प्रगती करत होते. याच प्रमुख कारण होतं , पर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे व्यापारी पूर्वी रेशिम मार्गाचा वापर करायचे. कुशाणाचं साम्राज्य कजाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर असणाऱ्या हिंदूकुश पर्वत रांगापर्यंत पसरलं होतं. या शिवाय कुशाणांनी चीनला युरोपाशी जोडणाऱ्या मार्गावर प्रभुत्व मिळवलं.

बौद्ध धर्माला दिलं संरक्षण

कनिष्कच्या काळात भारत आणि चीनच्या व्यापारी संबंधात सुधारणा झाल्या. व्यापार वाढीस लागला. त्यामुळं सांस्कृतिक देवाण घेवाणही सुरु झाली. याच कालखंडात भारतासह संपूर्ण आशियात बौद्ध धर्माचा (Buddhism) प्रचार जोरात सुरु होता. अशा परिस्थीत त्यानं बौद्ध धर्माला संरक्षण दिलं.

अनेक ऐतहासिक कागदावरुन हे सिद्ध होतं की त्यानं बौद्ध धर्माची संमेलनं आयोजित केली होती. कनिष्कच्या दरबारात अश्वघोष हा बौद्ध विचारवंत त्याचा राजकवी होता. कनिष्कनं भरवलेल्या संमेलनातून ज्या नव्या गोष्टी बाहेर आल्या, त्याला पुस्तकाचं रुप देण्यात आलं ‘महविभाषा’ असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. आजही या ग्रंथाला ‘बौद्धधर्माचा’ विश्वकोष म्हणून ओळखलं जातं.

मुल्तानमध्ये बांधलं सुर्यमंदिर

कनिष्कनं वर्तमानातील पाकिस्तानच्या पेशावर शहरात ज्याला आधी पुरुषपुर म्हणलं जायचं तिथं विशाल बौद्ध स्तूप बांधला. नंतरच्या काळात तो पाडण्यात आला पण चीनी प्रावासी फाह्यानच्या प्रवास वर्णनात त्यांचा संदर्भ आढळतो. या शिवाय त्यानं पाडलेल्या नाण्यांवरही बुद्धाची प्रतिमा असायची. कनिष्कनं पहिलं सुर्य मंदिर याच पेशावर शहरात बांधलं होतं.

कनिष्कनंच भारतात पहिल्यांदा शिवपुत्र कार्तिक यांची पुजा सुरु केली. कनिष्कच्या नाण्यांवरही कार्तिकेयच्या प्रतिमा आढळतात. या नाण्यांवर विशाख,.महासेन, स्कनंद इत्यादी कार्तिकेयची इतर नावं त्यानं नाण्यावंवर कोरली होती.

कोकणापर्यंत होता साम्राज्य विस्तार

कनिष्क असा पहिला सम्राट होता ज्यानं चीनचा पर्यंत मजल मारली. पश्चिमेकडं सिंधू नदीपासून कोकणापर्यंत कनिष्कच्या साम्राज्याचा विस्तार होता. आताचा बिहार, गुजरात, महाराष्ट्र हे प्रांत देखील त्याच्या ताब्यात होते.

सर्व काही ठिक सुरु असताना त्याचा जीव चीनच्या सम्राटाच्या मुलीवर आला. त्यानं लग्नासाठी तीला मागणी घातली पण चीनी सम्राटानं त्याला नकार दिला, म्हणून रागाच्या भरात कनिष्कनं चीनवर हल्ला केला. चीनचं सैन्य कनिष्कच्या सैन्याच्या तुलनेत अधिक सक्षम होतं. त्यामुळं कनिष्कला पराभव पहावा लागला. परंतू दुसऱ्यांदा त्यान जेव्हा चीनवर हल्ला केला तेव्हा त्यानं चीन जिंकून घेतला पण तिथं शासन प्रस्थापित करु शकला नाही. यानंतर इसवी सन १०२ मध्ये कनिष्कचा मृत्यू झाला. त्यानं २३ वर्ष कुशाण साम्राज्यावर राज्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER