कोल्हापुरातील कोरोनामृत्यूचा आलेख थांबला

Kolhapur Coronavirus Death

कोल्हापूर :- कोल्हापुरातील (Kolhapur) कोरोनामृत्यूचा आलेख थांबला आहे. बाधित रुग्णांची संख्याही ३४ वर आली असून दिवसभरात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यानंतर कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. कोल्हापुरात मे ते जून दरम्यान दररोज ३० ते ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते.

३० एप्रिल रोजी कोल्हापुरात प्रथमच कोरोनाबाधित (Corona) रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या दिवसात ३० वर गेली होती. नंतर दररोज मृतांची सरासरी संख्या १० ते १५ अशी होती. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या  संख्येत कमालीची घट होत आहे. मृतांची संख्याही कमी होत आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण ४८ हजार २२३ पॉझिटिव्हपैकी ४५ हजार ६५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण ९२२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ३४ पॉझिटिव्ह अहवालापैकी चंदगड २, गडहिंग्लज २, गगनबावडा १, हातकणंगले २, कागल २, करवीर ३, शिरोळ १, नगरपरिषद क्षेत्र २, कोल्हापूर महापालिका क्षेत्र १३ व इतर शहरे व राज्य ६ जणांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER