आमदार निलेश लंकेंनी जेथे सभा घेतली ती ग्रामपंचायत पडली ; भाजप नेत्याची टीका

Nilesh Lanke - Sujit Zaware Patil

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून या ८८ पैकी ७० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती.

पारनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती या जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील (Sujit Zaware Patil) व माजी आमदार विजयराव औटी (Vijayrao Auti) यांच्या गटाच्या आहेत. परंतु काही माध्यमांना हाताशी धरून लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत.

ज्या ठिकाणी आमदारांनी सभा घेतल्या, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यातून गेलेल्या आहे. खरं  तर आमदार पद असलेल्या व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये बूथवर बसून पैसे, मटण, दारू वाटून आमदार पदाची शान घालवली आहे, असा हल्लाबोल जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे (BJP) नेते सुजित झावरे पाटील यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : पुण्यात 19 नगरसेवक भाजपा सोडणार? गिरीश बापट यांनी दिले ‘हे’ उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER