राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेले वक्तव्य टाळायला पाहिजे होते – अमित शाह

CM Thackeray-Bhagat Singh Koshyari-Amit Shah

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमं,त्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवलेल्या पत्राविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी ते पत्र वाचले आहे. राज्यपालांनी पत्रात लिहलेले काही शब्द टाळायला पाहिजे होते, असे शाह यांनी म्हटले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह ( Amit Shah) यांनी हे भाष्य केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला दिल्ला दिला आहे. कोश्यारी यांनी शब्द जपून वापरायला हवेत. त्यांनी अधिक चांगल्या शब्दांचा वापर करायला पाहिजे होता, अशी सूचक टिप्पणी शाह यांनी केली. त्यामुळे आता यावर राज्यपाल कोश्यारी आणि त्यांची बाजू उचलून धरणारे राज्यातील भाजपचे नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मुलाखतीत अमित शहा यांनी शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एनडीएत ३० हून अधिक पक्ष आहेत. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाने स्वतःहून एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना बाहेर काढलं नाही. त्यांनी जर निर्णय घेतला असेल तर आम्ही काय करू शकतो. दोन्ही पक्षांचा कृषी विधेयकांना विरोध आहे. शिवसेनेसाठी भाजपचे दरवाजे उघडे किंवा बंद असं काही नाही. तसं काहीही घडलेलं नाही, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : मंदिरं तर उघडली नाहीत ; आता रामलीलासाठी भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER