मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला राज्यपलांनी निर्देश द्यावे ; मेटेंचे भगतसिंग कोश्यारींना पत्र

मुंबई : मराठा समाजा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्याला घेऊन तसेच मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्यपालांनी राज्यसरकारला निर्देश द्यावेत यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र लिहीले आहे.

मराठा आरक्षणाची मागणी ही तशी १९८९ पासून केली जात आहे. अलीकडच्या काळात, विशेषत: मंडलोत्तर जागतिकीकरणाच्या काळात तिला विशेष जोर आला आहे. आरक्षणाची मागणी करणाऱ्या विविध मराठा संघटना उदयाला आल्या. नवशिक्षित-अर्धशिक्षित बेरोजगार आणि संतप्त मराठा तरुणांना या संघटनांनी ‘आरक्षणामुळे आपले प्रश्न सुटतील’ असे आमिष दाखवल्याने आणि त्यांच्या सरंजामी मानसिकतेला चुकीच्या इतिहासाचे खतपाणी घातल्याने आरक्षणाच्या प्रश्नाचा तवा तापत आला आहे. आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही हा प्रश्न उचलून धरला आहे. थेट राज्यपालांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्यास मेटेंनी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी मेटेंच्या प्रश्नाला काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Check PDF :- Governor Bhagat Singh Koshyari Letter

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER