सरकारचा फ्यूज उडाला आहे, चित्रा वाघ यांची बोचरी टीका

Chitra Wagh

कल्याण : ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता वीज बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. या सरकारचा फ्यूजच उडाला आहे, अशी बोचरी टीका भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

त्या म्हणालात, जनतेला दिलेली आश्वासन पाळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. जनता सरकारला योग्य धडा शिकवेन. त्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे कल्याणमधील आडिवली -ढोकळी हळदी कुंकू कार्यक्रमात बोलत होत्या.

कुणाल पाटील यांनी बचत गटांच्या मोठ्या संख्येने नोंदण्या केल्या असून त्याचा फायदा घ्या, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले. कुणाल पाटील भविष्यात आमदार झाले तर मला आनंद होईल, असे त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER