सरकार पाच वर्षे चालणार, उद्धव ठाकरेच राहणार मुख्यमंत्री : संजय राऊत

Sanjay Raut-Uddhav Thackeray

मुंबई :- ठाकरे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. ते दिवाळीनिमित्त पत्रकारांशी बोलत होते. हे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधक सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत; पण मुख्यमंत्री संकटांचा सामना करून सरकार उत्तम प्रकारे चालवत आहेत, असे राऊत म्हणाले.

अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे हा तुमचा प्लॅन होता का?

शुक्रवारी राऊत यांची एक मुलाखत टीव्हीवर प्रसारित झाली. त्यांना, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजभवनात पार पडलेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. राऊत म्हणाले – माझ्या लहानपणी सात आंधळे आणि हत्तीची एक गोष्ट होती. त्यानुसार अजित पवार यांच्या राजभवनातील शपथविधीविषयी लोकांना जे काय अंदाज बांधायचे आहेत, ते बांधू द्या. सत्य काय आहे, ते आम्हालाच ठाऊक आहे.अजित पवार यांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का, या प्रश्नावर ही शक्यता संजय राऊत यांनी पूर्णपणे नाकारली नाही. मौन बाळगले. अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे सांगू शकतो? सत्य आम्हाला माहीत आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचे ते बांधा, असे मोघम उत्तर दिले.

२५ वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं

शिवसेना (Shivsena) आणि भाजपाची युती तुटण्याबाबतच्या प्रश्नावर राऊत म्हणालेत – राजकारणात आम्ही २५ वर्षे एकत्र होतो. भाजपासोबत आमचा भावनिक बंध तयार झाला होता. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला भाजपाशी नाते तोडावे लागले. हे नाते केवळ राजकीय नसून भावनिक होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले.

ही बातमी पण वाचा : जातीच्या आधारावर आरक्षण नको, हीच शिवसेनेची भूमिका – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER