अन्नधान्य, डाळी, तेल ,कांदा या कृषी उत्पादनांवर आता सरकारी नियंत्रण राहणार नाही; संसदेत विधेयक मंजूर

अन्नधान्य, डाळी, तेल ,कांदा - संसद

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी अत्यावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक कायदा (Essential Commodities Act) मंजूर करण्यात आला. ६५ वर्षांपासून चालत आलेल्या या कायद्यानुसार जीवनावश्यक वस्तू म्हणून समावेश असलेल्या कांदा, बटाटा, डाळ, तेल, अन्नधान्य यांना जीवनावश्यक वस्तूंमधून वगळण्यात आले आहे.

त्यामुळे त्यावरचे निर्बंध आता राहणार नसून शेतकरी आपला माल त्याला वाटेल त्या बाजारपेठेत विकू शकणार आहे. लोकसभेत (Lok Sabha) १५ सप्टेंबरला हे विधेयक मंजूर झालं होतं. आज राज्यसभेत (Rajya Sabha) त्याला मंजुरी मिळाली असून कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कृषी उत्पादनांवर आता सरकारी नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे या मालाची किंमत ठरविणे आणि विकणे शेतकऱ्याच्या हातात असेल. गरज पडली तर सरकार या प्रक्रियेचा आढावा घेणार आणि नियमांमध्ये बदल करणार असल्याचंही त्यात म्हटलं आहे.

देशातल्या अनेक शेतकरी संघटनांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. ती आता मान्य झाली असून शेतकऱ्याला अनेक नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER