… जनता नाराज असल्याने पडेल हे सरकार , दानवेंनी शरद पवारांना दिले उत्तर

Raosaheb Danve - Sharad Pawar

मुंबई : राज्यात तीन महिन्यात भाजपाचे (BJP) सरकार येईल, असे म्हटल्याबद्दल शरद पवार (Sharad Pawar) यांनी, दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहीत नव्हते, अशी भाजपाचे नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) टिंगल केली होती. त्याला आज दानवेंनी उत्तर दिले – मी भविष्य सांगितल्याने नाही, जनता नाराज असल्यामुळे हे सरकार पडेल.

पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले – माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की या राज्यातला कारभार आणि कारभारावर जनता नाराज आहे. राज्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दाव्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?”.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER