शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : परतीच्या मान्सूनच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीकविम्यासह नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेतकऱ्यांना दिला.

फुले पिंपळगाव येथील शेतकरी शेख शब्बीर शमशोद्दिन यांच्या चार एकर शेतातील सोयाबीन बुडाले. मुंडे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. अंतरपिकांचाही समावेश पंचनाम्यांमध्ये करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. मुंडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजय सिंह पंडित, उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महसूल, कृषी विभागाचे अधिकारी हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER