कोरोनामध्ये शहीद झालेल्या डॉक्टरांचा विमा नाकारून कोरोना योद्ध्यांची शासनाने थट्टा करू नये : डॉ . अन्नदाते

Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाने (Corona) देशात घातलेल्या धुमाकुळात अनेक दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे . माझे मित्र डॉ. पंकज चौधरी यांचा काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले . मात्र त्याच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा विमानांना ठाकरे सरकारने नाकारला आहे. चौधरी हे कोविड युनिटमध्ये काम करत नसल्याचे त्यांचा विमा नाकारण्यात आल्याचे स्पष्टीकरण सनाने दिले आहे . यावर प्रकरणावर डॉ . अमोल अन्नदाते (Amol Annadate) आवाज उचलला आहे. कोरोनामध्ये शहीद झालेल्या डॉक्टरांचा विमा नाकारून कोरोना योद्ध्यांची शासनाने थट्टा करू नये , अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला .

अशाच प्रकारे आतापर्यंत ५७ डॉक्टरचा विमा नाकारण्यात आला आहे . हे सर्व डॉक्टर खासगी रुग्णालयात काम करत होते . देशात आतापर्यंत ५०० डॉक्टरचा मृत्यू झाला तर १० हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आहे . कोविड योद्धे म्हणून गौरविले गेलेल्या डॉक्टरांना आता आणखी एका समस्येने ग्रासले आहे. कोविड ड्युटीशी संबंधित असलेल्या डॉक्टरांची विमा पॉलिसी उतरविण्यास अनेक खासगी कंपन्या नकार देत आहेत.

एक देशात कोरोनाचे संकट आहे . रुग्णालयात येणारा प्रत्येक व्यक्तीच आज कोरोनाबाधित निघतो अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे .मग ठाकरे सरकारला असे वाटते का कि खाजगी रुग्णालयात कोविडचे रुग्ण येत नाहीत . हे आमच्यासोबत मुद्दाम केले जात आहेत, असेही अन्नदाते म्हणाले .

डॉक्टरांचा सोशल मीडियातून अपप्रचार सुरू आहे. ना सरकार त्यांची काळजी वाहतेय, ना समाज त्यांना जवळ करतोय. अशा परिस्थितीत केवळ “कोविड योद्धा” म्हणायचे, पण सुविधा तर राहूच द्या, पण त्यांना त्यांच्या मरणाची किंमत द्यायला सुद्धा नकार द्यायचा, याला काय अर्थ आहे?असा सवाल डॉ . अन्नदाते उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER