अर्थसंकल्प सादर होण्याआधीच सरकारला मिळाली गुड न्यूज, जानेवारीत झाला फायदा

GST - Nirmala Sitharaman

नवी दिल्ली : २०२१ चा अर्थसंकल्प (Union Budget 2021) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज १ फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. त्याआधीच सरकारला दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी आली आहे. जानेवारीत जीएसटीच्या मिळकतीत विक्रमी तेजी आली. जानेवारीत जीएसटीत एकूण १. २० लाख कोटींपेक्षा जास कमाई झाली. अर्थ मंत्रालयाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ मधील जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढले. ३१ जानेवारी २०१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जीएसटी कलेक्शन १, १९, ८४७ कोटी रुपये होते. यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) २१,९२३ कोटी रुपये, राज्ये जीएसटी (SGST) २९,०१४ कोटी, एकिकृत जीएसटी (IGST) रुपये ६०, २८८ कोटी आणि सेर ८, ६२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटी विक्री परतावा भरल्याची संख्या जास्त असल्यामुळे हा आकडा आणखी जास्त असू शकेल.

फसवणक कमी झाल्याने वाढले कलेक्शन

जीएसटी कलेक्शन वाढीसंदर्भात सरकारी सूत्रांनि म्हटले आहे की, कर घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात आली. यामुळे रिटर्न फाइलिंगमध्ये तेजी आली. नोव्हेंबर २०२० पासून आतापर्यंत २७४ लोकांना अटक करण्यात आली आहे, तर ८५०० बोगस कंपन्यांविरूद्ध २७०० गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे ८५८ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जास्त जमा झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER