राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक

CM Uddhav Thackeray - Cinema Theatres

मुंबई : राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी थिएटर ओनर्सच्या प्रतिनिधींना दिली.

कोरोनामुळे (Corona) सहा महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.लॉकडाऊननंतर (Lockdown) सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. सिंगल आणि मल्टिप्लेक्स थिएटर्स आज राज्यभरात सुरू असली तरी थिएटर्स मालकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या सहा महिन्यांपासून थिएटर्स बंद असल्याने थिएटर्स मालकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER