मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Uddhav Thackeray On Maratha Arakshan

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत माहिती दिली.

तसेच मराठा समाजाच्या आरक्षणावरूनही भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, सरकार मराठा समाजाच्या मताशी, भावनेशी सहमत आहे. त्यामुळं कृपया मोर्चे, आंदोलने करू नका. कोणीही गैरसमज पसरवू नका. मराठा आरक्षणासाठी सर्वच पक्षांनी एकमताने ठाम भूमिका घेतली होती. उच्च न्यायालयात आपण जिंकलो.

सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. आधीच्या सरकारने नेमलेले वकीलच मराठा आरक्षणाची लढाई लढताहेत. उलट आपण आणखी चांगले वकील दिले. आपण कुठेही कमी पडलेलो नाही. देशातील इतर राज्यांप्रमाणे आपलं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जावं ही आपली विनंती होती. ती न्यायालयानं मान्य केली. पण ते करताना सध्याच्या आरक्षणाला स्थगिती दिली. हा विषय किचकट आहे. पण यावर सर्व संबंधितांशी चर्चा सुरू आहे.

विरोधी पक्षनेत्यांसोबतही मी आज बोललो आहे. ते आत्ता बिहारला आहेत. तेदेखील म्हणाले आहेत की, आम्ही सरकारसोबत आहोत. मोठ्या बेन्चकडे जायला परवानगी दिली त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. अनाकलनीय पद्धतीने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली आहे. त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. ज्येष्ठ विधिज्ञांसमवेत चर्चा करून सर्वोत्तम वकील दिले आहेत. आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यावर ठाम आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER