साेशल मीडियासह न्यूज पोर्टल्सवरही सरकारची करडी नजर

The government is also keeping a close eye on social media and news portals

नवी दिल्ली :- आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्शवणाऱ्या कंटेंटवर सेन्सॉरशिप आणणार आहे, ही माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने सोशल मीडिया (Social Media), डिजिटल न्यूज (News Portals) आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर निर्बंध लादले आहेत.

माध्यमात चुकीच्या बातम्या प्रसारित होण्याचे तक्रार सरकारकडे येतात. यातील बहुतांश प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहेत. महिलांच्याबाबतीत एडिट केलेल्या अश्लील फोटो माध्यमात अपलोड होतात. २४ तासांच्या आत हा फोटो काढून टाकण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. तसेच वापरकर्त्यांवरील निर्बंधही घालण्यात येतील.

केंद्र सरकार किंवा न्यायालयाने एखाद्या पोस्टबद्दल माहिती विचारल्यास सोशल मीडियावर प्रथम पोस्ट कोणी टाकली, याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियमावलीनुसार डिजिटल मीडियालादेखील प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायद्याअंतर्गत नियमांचे पालन करावे लागणार आहे.

पुढच्या तीन महिन्यात हे नियम लागू करण्यात येईल. समाज माध्यमांचा गैरवापर कमी व्हावा, सामाजिक आणि राजकीय वादग्रस्त पोस्ट कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यावर भर देण्यासाठीच हे नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER