महाराष्ट्रातलं सरकार आमचं नाही, शिवसेनेचं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचं खळबळजनक विधान

CM Thackeray-Prithaviraj Chavan

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे नेते सरकारचं काम व्यवस्थित सुरू असल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हे सरकार आमचं सरकार नाही तर शिवसेनेचं असल्याचं म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही-९ या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एका कार्यकर्त्याने मदतीसाठी फोन केला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तुम्हाला निधीची आवश्यकता असली तरी, आता सर्व निधी परत घेतला आहे. कोरोनासाठी. त्यामुळे मी केवळ विनंती करू शकतो. मी सरकारमध्ये नाही. महाराष्ट्रातलं सरकार आमचं नाही, शिवसेनेचं आहे, असंही ते म्हणाले. यावर कार्यकर्त्याने आपण ज्येष्ठ मंत्री असून, पुढे आपल्याला संधी आहे, असे म्हणताच जेव्हा संधी होती तेव्हा दिली नाही, आता पुढे बघू, असे म्हणत आपल्या मनातील खदखद त्यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पृथ्वीराज चव्हाण यांची आहे की नाही याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

 सौजन्य : TV9


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER