मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारने न्यायालयात व्यवस्थित मांडला नाही; शेलार यांचा आरोप

Ashish Shelar - Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा महाआघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) न्यायालयात व्यवस्थित मांडला नाही, अशी टीका भाजपाचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. हा मुद्दा अजून न्यायालयातच अडकलेला आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही, असे शेलार यांनी सूचित केले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून प्रवेश प्रक्रिया राबवली. पोलीस भरतीमध्ये एसईबीसीच्या तरुणांचा विचार न करताच जीआर काढण्याची हिंमत केली. हा जीआर आज सरकारने रद्द केला आहे.

सरकारच्या या धोरणावरून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तरुणांना नोकऱ्या, शिक्षणात संधी मिळावी असे या तिघाडी सरकारला वाटत नाही, अशी टीका शेलार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये केली. सरकार अशा कृतीतून समाजात तेढ निर्माण करते आहे. पोलीस भरतीबाबतचा जीआर सरकारने रद्द केला; पण सरकार किती वेळा मराठा समाजाच्या भावनेला असे नख लावणार, असा प्रश्न त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER