विमानाच्या परवानगीबाबत सरकारने कुठलीही सूचना दिली नाही, राज भवन कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)हे मुंबईतून (Mumbai) एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले असता राज्य सरकारचे विमानच उपलब्ध करून न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

दरम्यान, राज भवन कार्यालयातून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून वाद पाहिले आहे. पण, आज मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करू दिले गेले नाही. राज्यपाल आज सकाळी 10 वाजता मसुरी येथे नवनियुक्त आयएएस अधिकारी 122 बॅच कार्यक्रम यासाठी जाणार होते. त्यांनाशासकीय विमान उपलब्ध व्हावे यासाठी 2 फेब्रुवारीलाच मुख्यमंत्री कार्यालयाला कळवण्यात आले होते. त्यानुसार ठरलेल्या वेळेत राज्यपाल मसुरीला जाण्यासाठी विमानतळावर पोहचले. विमानात (plane) बसल्यानंतर राज सरकारने परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यपालांना परत राजभवनावर यावे लागले. त्यानंतर प्रवाशी विमानाने ते मसुरीला रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER