पोलिसांची हजारो पदे भरणार शासनाने घेतला हा निर्णय

mantralaya & Mumbai police

मुंबई :- राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने आज शेवटी घेतला. राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) कर्मचारी भरतीवरील निर्बंधातून पोलीस भरतीला शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय गेल्या नोव्हेंबरमध्ये घेतला होता पण त्या बाबतच्या आदेशाची प्रतीक्षा होती. शेवटी आज हा आदेश निघाला.

एकूण १२५२८ पदे भरली जातील. आता पहिल्यांदा ५२९७ तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित पदे भरण्यात येणार आहेत. ही नवीन पदे नाहीत, रिक्त पदांवरील भरती असल्याचे राज्य शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरतीबाबतचा आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या (Corona) लॉकडाऊनचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला बसला. मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क व इतर उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे आता सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागाने नोकरभरतीच करायची नाही असा आदेश मे २०२० मध्ये वित्त विभागाने काढला होता. अजूनही तो आदेश कायम आहे पण आज त्यातून पोलीस भरतीला सूट देण्याची भूमिका घेण्यात आली.

१३ नोव्हेंबर २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची २०१९ मधील रिक्त ५२९७ पदे, तसेच २०२० मधील ६७२६ पदे, मीरा-भार्इंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी ५०५ अशी एकूण १२५२८ पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्या संबंधीचा शासन आदेश आज काढण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER