एका जातीचा सरकारने विचार केला : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई :- मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरीम स्थगिती दिल्यानंतर पोलिस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या परीक्षा देऊ नयेत अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी टीका केली आहे. परीक्षा रद्द करताना सरकारने एका जातीचा विचार केला. मात्र, उर्वरित 85 टक्के जनतेचे काय? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

पोलिस भरतीपाठोपाठ एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. आंबेडकर म्हणाले की, एका जातीचे राजकारण चालणार नाही. मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार अतिरेक करत आहे. केंद्राच्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी केली जात नाही. वारकरी संप्रदायाने आंदोलन केल्यामुळे मंदिरे उघडली जात नाही. सरकार वारकर्‍यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असे दिसते, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई: प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER