सरकारने आधारभूत किमतीने खरेदी केले ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तचे धान

The government bought paddy worth over Rs 70,000 crore

नवी दिल्ली : यंदाच्या खरीप हंगामाच्या खरेदीअंतर्गत केंद्र सरकारने ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तचे धान किमान आधारभूत किमतीने खरेदी केले, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.

देशभरातल्या सुमारे ४० लाख ५३ हजार शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. महाराष्ट्र आणि पंजाबसह १५ राज्यांमध्ये धानाची खरेदी सुरु आहे. आत्तापर्यंत ३७२ लाख टन धानाची खरेदी झाली असून, यापैकी २०२ लाख टन धानाची खरेदी फक्त पंजाबमधून करण्यात आली, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली. सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार सरकार शेतमालाची खरेदी सुरूच ठेवणार असल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER