कार्यकर्त्यांच्या सदिच्छांनी बळ मिळाले; शरद पवारांनी मानले आभार

Sharad Pawar Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्या केल्यानंतर पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे . त्यानंतर, देशभरातून शरद पवार यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांनी काळजी व्यक्त करत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनीही या सर्वांचे आपल्या ट्विटर अकाउंटवरून आभार मानले आहेत.

“माझे सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मित्रमंडळींनी व सुहृदांनी आवर्जून तब्येतीच्या चौकशीसाठी फोन केले, संदेश ठेवले, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांचे बळ मिळाले. मन:पूर्वक धन्यवाद !” असे ट्विट पवार यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button