
नवी दिल्ली :- ब्रिटनसह युरोपातील आणि पश्चिमेतील इतर देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता भारतात 16 जानेवारीपासून (January 16) प्रत्यक्ष लसीकरण (Vaccine) सुरू होणार आहे. सध्या भारतात लसीचा दुसऱ्या टप्प्यातील ड्राय रन सुरू असून, देशभरातील जिल्ह्यांमध्ये लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आता प्रत्यक्ष नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून एकाच वेळी देशभरात लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. त्यात डॉक्टर, नर्स यांच्यासह आरोग्य सेवक आणि सेविकांचा समावेश असणार आहे.
या टप्प्यात 3 कोटी भारतीय लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्या बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, कॅबिनेट सचिव उपस्थित होते. पुढच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरीक, महिला, गर्भवती स्त्रिया, पोलिस, यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला