अनेकांचे लक्ष्य सरकार पाडण्याकडे, मात्र जनतेच्या आशीर्वादाने १ वर्ष पूर्ण केलं – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona) धोका आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे. अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

युरोपातील देशांमध्ये चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. युरोपात कोरोनानं रुप बदललंय, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला, युरोपातील परिस्थितीवरुन शिकलं पाहिजे. परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत. लस आल्यानंतरही मास्क बंधनकारक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन, कोरोनाने अवतार बदलल्यामुळे ही वेळ आली. असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपवरही टोला लगावला. कोरोनाच्या संकटकाळात सरकार तटस्थ आहे. अनेकांचे लक्ष सरकार पाडण्याकडे लागलेले होते. महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल उद्या पडेल सांगितलं जात होत. मात्र जनतेच्या आशीर्वादाने आमच्या सरकारने १ वर्ष पूर्ण केलं, असे म्हणत त्यांनी भाजपच्या नेत्यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER