या कलाकारांनी घेतल्या मुली दत्तक

The girls adopted by these artists

मुलांची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे सोपे नसते. त्यामुळे अनेक जण विनाअपत्य राहाण्याचा विचार करतात तर काही जणांना मुले हवी असल्याने दत्तक घेतात किंवा आता सरोगसीचा पर्याय उपलब्ध असल्याने सरोगसीच्या माध्यमातून मुलांची इच्छा पूर्ण करतात. मात्र लग्न होण्यापूर्वीच किंवा मुले असतानाही दत्तक घेणे सोपे नसते. त्यातही मुलींना कोणी दत्तक घेत नाही. परंतु बॉलिवुडमधील (Bollywood) काही कलाकारांनी मुलींनाच दत्तक घेतले आहे.

mithunया यादीत सगळ्यात अगोदर नाव घ्यावे लागेल ते मिथुन चक्रवर्तीचे (Mithun Chakraborty). मिथुन खरोखरच अत्यंत संवेदनशील आहे. बॉलिवुडमध्ये मिथुनप्रमाणे जॅकी, जॉनी लिव्हर असे काही कलाकार आहेत जे समाजाचे देणे आपल्या पद्धतीने चुकवत असतात परंतु त्याची जाहिरात करीत नाहीत. मिथुनने योगिता बालीशी लग्न केले. मिथुनला नामाशी, रिमोह आणि मिमोह अशी तीन मुलेही आहेत. कलकत्यात एकदा कचऱ्याच्या डब्यात लहान मुलाच्या रडण्याच्या आवाज ऐकून लोकं थांबले आणि त्यांनी त्या डब्यात पाहिले तर एक लहान मुलगी रडत होती. लोकांनी लगेचच सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अधिकारी आले आणि मुलीला एका एनजीओमध्ये घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी एका बंगाली वर्तमानपत्रात ही बातमी आली. मुलगी अत्यंत अशक्त होती आणि तिला उपचाराचीही गरज होती. मिथुनने ही बातमी वाचली आणि त्याचे मन द्रवले. त्याने मुलगी दत्तक घेण्याचा विचार केला. पत्नी योगिताला ही गोष्ट सांगितल्यावर योगिताही लगेचच तयार झाली. दोघेही त्या मुलीला जेथे ठेवले होते तेथे गेले. मुलीची दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत योगिता त्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या मुलीला घरी आणले आणि तिचे नाव दिशानी ठेवले. सख्ख्या मुलीप्रमाणेच या मुलीचे संगोपन चक्रवर्ती कुटुंबियांनी केले. आज ही मुलगी न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेत असून पित्याप्रमाणे तिलाही बॉलिवुडमध्ये आपले नाव कमवायचे आहे.

यानंतर नाव घेता येईन रविना टंडनचे (Raveena Tondon). याचे कारण असे की केवळ वयाच्या 21 व्या वर्षी आणि तेही लग्न झालेले नसताना Raveena Tandon adopted two girls, Chhaya and Pooja in 1995, much marrying  Anil Thadani. Raveena and Anil are proud parents of Rasha and Ranbir.रविनाने एक नव्हे तर चक्क दोन मुलींना दत्तक घेतले. तेव्हा ती चित्रपटात यशस्वी कलाकार म्हणून कामही करीत होती. रविना आणि तिची आई नेहमी अनाथआश्रमांना भेट देत असत आणि मदत करीत असत. 1994 मध्ये रविनाच्या एका नातेवाईकाचे निधन झाले. त्याला छाया आणि पूजा अशा दोन लहान मुली होत्या. त्या मुलींचा सांभाळ करणारे कोणी नसल्याने रविनाने त्या दोघींना घरी आणले आणि त्यांचे संगोपन करण्याचे ठरवले. त्यावेळी मला अनेकांनी सांगितले की, असे करू नकोस. या मुलींमुळे तुझे लग्न होणार नाही. परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम होते. मी काही कोट्याधीश नव्हते परंतु त्या मुलींचे योग्य संगोपन करण्याची माझी क्षमता होती. तसेच होणाऱ्या नवऱ्याला मी या मुली आणि माझ्या कुत्र्यासह स्वीकारणार असेल तरच लग्न करीन अशी अट घालण्याचेही मी ठरवले होते. सुदैवाने अनिल थडानीने माझी अट मान्य केली अशी माहिती रविनाने एकदा बोलताना दिली होती. लग्नानंतर रविनाला राशा आणि रणबीर अशी दोन मुले झाली. तरीही तिने आपल्या दत्तक मुलींचा सांभाळ सुरु ठेवला होता. तिच्या एका दत्तक मुलीचे लग्न झाले आणि तिला एक मुलगाही झाला आहे. त्यामुळे रविना पन्नाशीच्या आतच आजीही झाली. आणि विशेष म्हणजे रविनाने आपले हे आज्जीपण सोशल मीडियावर साजरेही केले.

Sushmita Sen shares her 'love story' as daughters Renee and Alisah play the  piano, watch - bollywood - Hindustan Timesआता नाव घेता येईल सुष्मिता सेनचे (Sushmita Sen). मिस यूनिर्व्हसचा खिताब पटकावणाऱ्या सुष्मिता सेननेही तरुण वयातच मुल दत्तक घेण्याचा विचार केला आणि 2000 मध्ये एका लहान मुलीला दत्तक घेतले. या मुलीचे नाव तिने रैने ठेवले. आपली करिअर आणि मुलीचा सांभाळ ती योग्य प्रकारे करीत होती. मुलीला कसलीही कमतरता पडू नये याची ती पूर्ण काळजी घेत होती. यानंतर काही वर्षांनी म्हणजे 2009 मध्ये सुष्मिताने आणखी एक तीन महिन्याची मुलगी दत्तक घेतली. सुष्मिताने तेव्हा सांगितले होते, रैनीसोबत खेळण्यासाठी आणखी कोणी तरी हवे म्हणून मला मूल दत्तक घ्यायचे होते. परंतु एका मुलीला दत्तक घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्याही मुलीलाच दत्तक घेता येत नसल्याचा कायदा होता. त्यामुळे मी दत्तक घेऊ शकत नव्हते. परंतु आता कायद्यात बदल झाला असल्याने मी आणखी मुलगी दत्तक घेतली असून आज दोन मुलींची आई होऊन मी खूप आनंदी आहे. सुष्मिताने या मुलीचे नाव अलिसा ठेवले आहे. सुष्मिताने लग्न केले नाही आणि सिंगल मदर म्हणूनच ती या मुलींचा सांभाळ करीत आहे.

या यादीत सलमान खानचे वडिल सलीम खान, प्रख्यात अभिनेत्री नीलम, प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांचीही नावे घेता येतील या तिघांनीही मुलींना दत्तक घेतलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER