‘किस’ करण्याच्या लाजेमुळे अक्षयकुमारला केले होते रिजेक्ट; मिस्टर खिलाडीने केला खुलासा

Akshay Kumar - Kapil Sharma

अक्षयकुमारने (Akshay Kumar) नुकतेच पत्नी ट्विंकल खन्नासमवेत २० वा विवाहाचा वाढदिवस साजरा केला आहे. अनेक अभिनेत्रींनी प्रेम नाकारल्यानंतर अखेर अक्षयकुमारला ट्विंकल खन्नाशी (Twinkle Khanna) प्रेम झाले. तथापि, एक काळ होता जेव्हा अक्षयकुमार प्रेमात अपयशी झाला. इथपर्यंत की पहिली मुलगी जिला अक्षयकुमारने डेट केले होते, त्या मुलीनेही त्याला नकार दिला.

हे अक्षयकुमारने खुद्द सांगितले. तो त्या मुलीबरोबर तीन ते चार वेळा डेटिंगवर गेला होता. यामध्ये एकदा चित्रपट पाहणे आणि एकदा उडुपी रेस्टॉरंटला भेट देणे या गोष्टींचा समावेश होता. मात्र त्यानंतर या मुलीने अक्षयकुमारला नकार दिला. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खिलाडी कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने सांगितले की, ‘समस्या अशी होती की मी खूपच लाजाळू होतो. मी खांद्यावर हात कधी ठेवला नाही. हात धरला नाही. मी हात धरावे किंवा किस करावे अशी तिची इच्छा होती. मी असे केले नाही म्हणून ती मला सोडून गेली. यावर कपिल शर्माने विचारले की, या प्रकरणातून तुम्ही काय शिकले?

त्याला उत्तर म्हणून अक्षयकुमारने स्वतःच्या स्टाईलमध्ये म्हटले की मग मी पूर्णपणे बदललो आणि युटर्न घेतला. रविवारी अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. यावेळी त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या पत्नीच्या नावावर एक रोमँटिक मेसेज लिहिला.

अक्षयकुमार अनेकदा आपले मत उघडपणे ठेवतो. या अंतर्गत त्याने आपली लव्ह स्टोरी आणि प्रेमातील अपयशांबद्दलही उघडपणे सांगितले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अक्षयकुमारचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. इतकेच नव्हे तर सूर्यवंशी, पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षाबंधन आणि राम सेतू हे त्याचे चित्रपट येत्या काही दिवसांत रिलीज होणार आहेत. अलीकडेच त्याचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला; परंतु तो फारसा काही खास करू शकला नाही. मात्र, याद्वारे अक्षयकुमारने डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER