इथं सामान्य जनतेला इंजेक्शन मिळत नाहीत, रोहित पवारांना कुठून मिळाले ? निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane - Rohit Pawar - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे . रुग्णसंख्या पाहता बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केलं. यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

सामान्य जनतेला रेमडेसिवीर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही, मात्र रोहित पवारांना वाटप करण्या इतपत रेमडेसिवीर इंजेक्शन कुठून मिळाले? रेमडेसिवीर तुम्हाला कुठून व कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध झाले याचा रोहित पवारांनी खुलासा करावा. नाही तर तात्काळ सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : रोहित पवारांच्या हस्ते रेमडीसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप ; सोलापूरच्या रुग्णांसाठी मदत

दरम्यान रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केलं होतं. राष्ट्रवादी वेल्फेअर फंड यांच्यावतीने पहिल्यापासून प्रत्येक जिल्ह्याला औषधांची मदत करण्यात आली. याचप्रकारे गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत देण्यासाठी शक्य तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन नगर, पुणे, सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणच्या सरकारी यंत्रणेकडं सुपूर्द केले आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button