गेहलोत सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

Ashok-Gehlot-Sachin-Pilot-1

जयपूर : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत (Ashok gehlot) सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin pilot) यांनी बंड पुकारल्याने काही दिवसांपूर्वी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेचे अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

सचिन पायलट पुन्हा पक्षात परतल्याने गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट टळले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विरोधकांनी अनेक प्रयत्न करूनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला, असे ते म्हणाले.

गांधी कुटुंबाची भेट घेटल्यानतंर सचिन पायलट यांचे बंड शमले आणि अशोक गेहलोत सरकारवरील संकट टळले. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेत समेट झाल्याचेही दर्शवले होते. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काहीही झाले तरी सरकार पडू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. भाजपा सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला.

 

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात जी फसगत झाली, तोच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER