सरकारच्या भविष्याची जबाबदारी फक्त आमची नाही; राज्यातील काँग्रेसचे नेते चिडले

- अगतिकतेतून शिवसेनेला करून दिली आठवण

Naseem Khan

मुंबई :- शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत (MVA)शिवसेना आणि राष्ट्रवादी नेहमी काँग्रेसला ढोसत असतात. शिवसेनेची मजल तर, काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआचे नेतृत्व राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे सोपवा, असे सुचवण्यापर्यंत गेली. यामुळे काँग्रेसचा संताप झाला. काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर नसीम खान यांनी शिवसेनेला सुनावले, शिवसेना संपुआचा सदस्य नाही; शिवसेनेने संपुआच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसला सल्ला देऊ नये.

मुंबई प्रदेश काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि काॅंग्रेसचा वर्धापनदिन यानिमित्त झालेल्या सभेत ही भाषणे झाली. मुंबई प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांनी या वेळी सूत्रे स्वीकारली. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) व इतर नेते उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. शिवसेनेनेही त्याचे आडून समर्थन केले होते. यामुळे काँग्रेसचा मानभंग झाला. याबाबत कोणाचेही नाव न घेता नसीम खान (Naseem Khan) म्हणालेत, राहुल गांधीकडे कोणी बोट दाखवेल त्याचे बोट तोडू.

दरम्यान, तिन्ही पक्षांचे लहान-लहान नेते व कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. याचा सर्वात जास्त फटका काँग्रेसला बसतो आहे, त्यामुळेही काँग्रेसची चिडचीड होते आहे. याबाबत नसीम खान म्हणालेत की, आमच्या पार्टीच्या लोकांना इतर पक्षात का घेतले जाते? आमचा पक्ष दुबळा करण्याचे काम का करतात? शिवसेना आणि एनसीपीने असे वागू नये, आमच्या लोकांना पक्षात घ्यायचे तर थोरात, चव्हाण यांच्याशी चर्चा केली पाहिजे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल. या सरकारच्या भविष्याची जबाबदारी फक्त काँग्रेसची नाही, ही जबाबदारी शिवसेनेचीही आहे.

काँग्रेसच्या आमदारांना विकास कामांसाठी पैसे मिळत नाहीत या तक्रारीबाबत खान म्हणालेत, अमीन पटेल, झिसान सिद्दीकी या आमदारांना निधी दिली जात नाही. हे मु्ददाम केले जात आहे का ?

सध्या मुंबई (Mumbai) महापालिकेची निवडणूक हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. सध्या ही मनपा शिवसेनेच्या ताब्यात आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सोबत लढवावी, असे सैद्धांतिक पातळीवर सर्वांना मान्य असले तरी आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करतो आहे. याबाबत नसीम खान म्हणालेत, काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि महापौर काँग्रेसचा होईल यासाठी प्रयत्न करावेत.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसने पाठिंबा काढताच अजितदादा आमच्यासोबत येतील ; रामदास आठवलेंना विश्वास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER