
बीड : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोजचे रुग्णवाढीचे आकडे ५० हजारापार पोहचत आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी अजूनही परिस्थिती आटोक्यात नाही. स्वामी रामानंद तीर्थ कोविड सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या आठ जणांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगरपालिकेवर आली.
अंबाजोगाई हॉटस्पॉट
दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसांत जवळपास ५०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. वाढत्या कोरोना रुग्णाच्या आकडेवारीला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून १० दिवसांचा लॉकडाऊन केला होता. लॉकडाऊनमध्ये एसटी सेवा पूर्णपणे बंद होती.
औरंगाबादमध्ये अंत्यसंस्काराला जागा मिळेना
अंत्यसंस्कारासाठी औरंगाबादच्या स्मशानभूमीत जागा अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची गर्दी होत आहे. जागा मिळेल तिथे नातेवाईक दाहसंस्कार करत आहेत. टीव्ही सेंटर स्मशानभूमीत सर्वत्र पेटलेल्या चिंतांचे चित्र आहे. एक चिता विझण्याआधीच दुसरी चिता पेटत आहे. कोरोना मृत्यूचा आकडा वाढल्यामुळे स्मशानभूमीतही मरणासन्न स्थिती आहे.
बीड कोरोना केसेस
१. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- २८,४९१
२. एकूण मृत्यू- ६७२
३. एकूण कोरोनामुक्त- २५,४३६
४. अॅक्टिव्ह रुग्ण- ४,८९८
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला