महाविकास आघाडीचं चौथं चाक महाराष्ट्राची जनता , राज्यावर राजकीय संकट येणार नाही – मुख्यमंत्री

CM Thackeray

मुंबई : ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. यावेळीत्यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या कामकाजावर भाष्य केले.

आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चाललं आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही. त्यामुळे राज्यावर राजकीय संकट येणार नाही. राजकीय संकट आणणार असाल तर तसं होणारही नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

तीन चाकांचं सरकार अशी आमच्यावर टीका करण्यात आली. पण हे सरकार केवळ तीन चाकांचं नाही. या सरकारला चौथं चाकही आहे. हे चौथं चाक जनतेच्या विश्वासाचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनता जनार्दनाचा रथ आहे. तो पुढेच धावेल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही. महाराष्ट्र कधीही कुणाला घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. माझं एक एक पाऊल मी दमदारपणे टाकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

तसेच, आमचं सरकार आल्यानंतर राज्यात संकटाची मालिका सुरू झाली. नैसर्गिक संकटातही काही लोकांनी राजकारण केलं. हे दुर्देवी आहे, अशी भाजपवर टीका करतानाच कोरोनाच्या काळात आम्ही कधी कोरोनाच्या आकड्यांची लपवाछपवी केली नाही. या संकटावरही आपण लवकरच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER