कोयना धरणाचे चार दरवाजे उघडले

Koyana Dam

सातारा : कोयना धरण अंतर्गत भागात सुरू असलेला पाऊस व धरण पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्याने पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून तर आज दुपारी धरणाचे चार वक्री दरवाजे एका फुटाने उचलून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ८३५३ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.

या पाण्यामुळे व पूर्वेकडे पडणाऱ्या पावसामुळे कोयना नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या १०४.४९ टीएमसी पाणीसाठा झाला असून केवळ ०.७६ टीएमसी इतकीच पाणी सामावून घेण्याची क्षमता शिल्लक आहे. त्यामुळे धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १०५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते.

आजपासून पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यानंतर दुपारी धरणाचे चार वक्री दरवाजे एका फुटाने उचलून त्यातून प्रतिसेकंद  ६२५३ व पायथा वीजगृहाची  वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक्स असे एकूण प्रतिसेकंद ८३५३ क्युसेक्स पाणी पूर्वेकडे सोडण्यात येत आहे. या पाण्यासह पूर्वेकडील विभागात पडणाऱ्या पावसामुळे कोयना नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER