अमृतांजन बामच्या संस्थापकामुळंच आंध्रप्रदेश राज्याच्या निर्मितीचा पाया रचला गेला होता !

Amrutanjan Bam - Maharastra Today

‘अमृतांजन बाम’ १९८० आणि ९०च्या दशकात घराघरात पोहचला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आयुष्याचा तो हिस्सा बनला आहे. त्यावेळी क्वचितच एखादं घर सापडायचं जिथं अमृतांजन बाम मिळाला नसेल. पिवळ्या रंगाच्या लहानशा काचेच्या बाटलीत हा जादुई मलम मिळायचा. यामुळं अनेक प्रकारच्या त्रासांवर उपाय व्हायचा. डोकेदुखीपासून ते पाठ दुखी, अंगदुखी सर्व समस्यांवर यामुळं उपाय मिळायचा. भारतात इतका प्रसिद्ध असणारा हा बाम एका पत्रकारामुळं आपल्याला मिळाला ही बाब तुम्हाला माहितीये का?

‘काशीनाधुनी नागेश्वर’ नावच्या एका स्वातंत्र्य सैनिकानं हा बाम भारतीयांसाठी बाजारात आणला. ते एक पत्रकार आणि समाजसुधारक होते. त्यांना नागेश्वर राव या नावानं देखील ओळखलं जायचं. त्यांनी बाम बनवायच्या आधी गांधींजींसोबत सविनय सत्याग्रहात ही सहभाग घेतला होता. तसेच आंध्रप्रदेश राज्य निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

राव यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात १८६७ साली झाला. त्यांनी गृहनगरच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं तर मद्रासच्या ख्रिश्चन महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. यानंतर त्यांना औषध बनवण्याच्या व्यवसायकडं आपला मोर्चा वळवला. यासाठी ते कलकत्त्याला गेले. तिथं त्यांनी औषध बनवण्याविषयीचं सर्व ज्ञान घेतलं. यानंतर ते युरोपच्या ‘विलियम अँड कंपनी’मध्ये काम करण्यासाठी मुंबईला गेले. तिथून त्यांनी यशाच्या शिड्या चढायला सुरुवात केली ते मालक बनले. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होतं पण त्याआधी त्यांनी तेलगू पुनर्जागरण आंदोलनाचे जनक कंदुकुरी वीरसलिंगम यांनी त्यांना प्रचंड प्रभावित केलं होतं.

कलकत्त्यातल्या कामाच्या अनुभवावर राव यांनी एनाल्जेसिक बाम तयार केला. मोठ्या प्रमाणात याच्या निर्मितीसाठी त्यांनी मुंबईत कारखाना सुरु केला. १८९३ साली त्यांनी कंपनीची स्थापना केली. प्रत्येक व्यवसायाच्या सुरुवातीचा काळ कठिण असतो. वाट संघर्षाची असतेय यातून बाहेर पडण्यासाठी राव यांनी संगित समारंभाचं आयोजन केलं. तिथं उपस्थीत लोकांना बाम मोफत वाटण्यात आला. ही रणनिती सफल ठरली. अनेकदा अशी रणनीती वापरण्यात आलीये. ‘वॉशिंग पावडर निरमा’चे निर्माते किसनभाई पटेल यांनी हीच रणनिती वापरत निरम पावडरीला ब्रँड बनवलं होतं.

संगित कार्यक्रमानंतर नागेश्वर राव यांनी व्यवसायात मोठी प्रगती साधली. सुरुवातीच्या दिवसात बामची किंमत फक्त दहा आणे ठेवण्यात आली होती. किंमत छोटी असली तरी विक्री मोठ्याप्रमाणात होऊ लागली. लवकरच या बामनं आंध्रप्रदेशच्या व्यापाऱ्याला करोडो रुपये कमावून दिले.

आंध्रप्रदेशची निर्मिती

व्यवसाय सुरळीत चालू लागला तेव्हा राव यांनी व्यवसायातून बनलेल्या प्रतिमेचा उपयोगही करुन घेतला. अनेक सामाजिक सुधारणा करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना जाणीव होती की तेलगू लोकांसाठी स्वतंत्र राज्य असावं. मुंबईतून अमृतांजन बाम बनवणाऱ्या नागेश्वर राव यांनी तेलगू भाषिकांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला. यानंतरत्यांनी ‘आंध्र पत्रिका’ नावाचं साप्ताहिक सुरु केलं.

पाच वर्षाच्या आत ही पत्रिका लोकप्रिय झाली. राव यांनी १९३६ साली मद्रासला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. तिथूनचे ते प्रभावीपणे काम करु शकतात याची त्यांना जाणीव होती. त्यांची पत्रिका मोठ्या दैनिकाच्या रुपात पुढं आली. मद्रास प्रेसिडेन्सीतून आंध्रप्रदेशच्या विभाजनासाठी त्यांनी अनेक लेख लिहले.

नंतरच्या वर्षात राव यांनी मागण्या मंजूर करण्यासाठी प्रखर भूमिका घेतली. आंध्रप्रदेशच्या स्थापनेसाठी काम करणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांच नाव सामील झालं. तेलगू भाषिकांच त्यांना समर्थन मिळालं. प्रयत्नांना मजबूती देण्यासाठी त्यांनी समितीची स्थापना बनवली.

१९२४ से १९३४ पर्यंत राव यांनी आंध्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचं अध्यक्ष पद सांभाळलं. यानंतर त्यांच्या निरंतर प्रयत्नांमुळ, स्वातंत्र्य संग्रातील भागिदारीमुळं आणि राष्ट्रवादावरील लेखांमुळं त्यांना ‘देसोद्वारका’ (म्हणजे जनतेचं उत्थान करणारा) ही पदवी जनतेनं दिली. नोव्हेंबर १९३७ साली त्यांनी आंध्र राज्याच्या स्थापनेसाठी चर्चा करायला बैठक बोलावली. आंध्रप्रदेशच्या निर्मितीसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. या बैठकीनंतर पाच महिन्यांमध्येच ११ एप्रिल १९३८ ला त्यांच निधन झालं. आयुष्यभर ज्या प्रयत्नासाठी केले तो क्षण ते पाहू शकले नाहीत. आंध्रप्रदेशच्या मागणीत मोठा काळ गेला. १९ डिसेंबर १९५२ साली आंध्रप्रदेश राज्याची स्थापना झाली. अमृतांजनपासून सुरु झालेला त्यांच्या प्रवासानं अनेक वळणं घेतली. संघर्ष केला. जिद्द हेच यशासाठी लागणारं मोठं भांडवल आहे हा त्यांचा जिवनाचा संदेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button