‘गड आला पण सिंह गेला !’ नंंदीग्राममधून ममतादीदींचा पराभव

कोलकाता :- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार, याकडे संपूर्ण देशासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्वीकारत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.

तृणमूल काँग्रेस २०९ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ८२ तर इतर २ जण आघाडीवर आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला आहे. नंदीग्राममधून ममता बॅनर्जी या १ हजार ९५७ मतांनी पराभूत झाल्या आहेत.

दरम्यान, आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार २०० पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button