वॅक्सीन बनवण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांनाही द्यावा; केजरीवालांचा पंतप्रधानांना सल्ला

Arvind Kejriwal - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक सल्ला दिला आहे. देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी लसीचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. यासाठी लस तयार करण्याचा फॉर्म्युला इतर लस निर्मात्या कंपन्यांनाही देऊन मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जावा. यामुळे देशात लसीकरण मोहिमेला गती मिळू शकेल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

आपण सध्या सव्वा लाख लसीचे डोस देत आहोत. लवकरच ही संख्या ३ लाखांवर पोहचण्याचे लक्ष्य आपल्यासमोर आहे. अजूनही लसीची समस्या आपल्यासमोर उभी आहे. यासाठी लस निर्मितीचे काम केवळ दोन कंपन्यांकडे राहू नये. केवळ काही दिवस पुरेल एवढीच लस उपलब्ध आहे आणि ही देशव्यापी समस्या आहे, अशी चिंता व्यक्त करत केंद्राने या कंपन्यांकडून लस तयार करण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांसाठी उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे आपण कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेऊ शकतो, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : सिरमचा ५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला

याव्यतिरिक्त, लस कंपन्यांच्या उत्पादनाचा काही भाग मूळ कंपन्यांना रॉयल्टी म्हणून दिला जाऊ शकतो, असा प्रस्तावही केजरीवाल यांनी मांडला आहे. देशात कोरोना संसर्ग दाखल झाले तेव्हा पीपीई कीटची कमतरता भासत होती. काही कंपन्यांकडेच हे काम असते तर ही कमतरता कायम राहिली असती. मात्र, आज पीपीई कीटची कमतरता नाही, याची जाणीव केजरीवाल यांनी करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button