गडचिरोलीतील सर्वांत मोठ्या सिरोंचा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Mahavikas Aghadi

गडचिरोली :- गडचिरोलीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी एकूण ३५० ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू आहे. निकालाचा पहिला कल हाती आला असून सर्वांत  मोठी समजली जाणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. ही ग्रामपंचायत तालुक्यात सर्वांत मोठी समजली जाते. या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे.

तर काँग्रेसनेही खाते उघडले आहे. जिल्ह्यातील आदीमुत्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील गडचिरोली जिल्ह्यातील ३५० ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER