मुंबई मनपावर २०२२ ला फडकेल भाजपा-आरपीआय युतीचा झेंडा : रामदास आठवले

Ramdas Athawle

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीत मनपावर भाजपा-शिवसेना युतीचा झेंडा नक्की फडकेल. या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव नक्की आहे, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला.

बांद्रा येथील ‘संविधान’ निवासस्थानी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलमधील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश झाला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना उत्तर भारतीय सेलचे उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष रमेश संतलाल गौड, निमित्त तन्ना, डेमियल डीसा, श्रीमती कृष्णा गुलाब गौड यांच्या नेतृवात शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील शिवशक्ती- भीमशक्ती एकजूट आता शिवसेनेने संपुष्टात आणली आहे. त्यामुळे आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रिपब्लिकन पक्ष भाजपा युती निवडणूक मैदानात उतरेल असे रामदास आठवले म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER