पहिल्या पत्नीने संजय दत्तसाठी सर्व काही सोडले; ३२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Richa Sharma-SanjayDatt

संजय दत्तसारख्या इतर बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्याचे कदाचितच  आयुष्य इतके वादग्रस्त राहिले असेल. संजयच्या पहिल्या पत्नीचे नाव रिचा शर्मा (Richa Sharma) होते. ती अभिनेत्री होण्यासाठी भारतात आली होती. पण ती अभिनेत्याच्या प्रेमात पडली आणि मग दोघांचे लग्न झाले. ही कथा फक्त अशी नाही. रिचाने वयाच्या ३२ व्या वर्षी हे जग सोडले. १० डिसेंबर रोजी रिचाची पुण्यतिथी असते.

रिचा शर्माचा जन्म ६ ऑगस्ट १९६३ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. ती देव आनंदच्या चित्रपटात नायिका बनली होती; परंतु वयामुळे तिला काम मिळू शकले नाही. तथापि, देव आनंद यांनी रिचाला आपल्या पुढच्या ‘हम नौजवान’ या चित्रपटात संधी दिली. ‘हम नौजवान’ १९८५ साली रिलीज झाला  होता. यानंतर, ती ‘अनुभव’, ‘इन्साफ  की आवाज’, ‘सडक छाप’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली. रिचा शर्माचा शेवटचा चित्रपट १९८७ मध्ये आलेला ‘आग ही आग’ हा होता. या चित्रपटादरम्यान रिचाची भेट संजय दत्तशी झाली. मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तने प्रथम स्थानिक मासिकात रिचाचे फोटो पाहिले. हे फोटो पाहून तो प्रेमात पडला.

‘आग ही आग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रिचाला संजयने प्रपोज केले होते. रिचाही त्याला हो म्हणाली. असं म्हटलं जातं की, लग्नानंतर रिचा चित्रपटात काम करू नये अशी संजयची इच्छा होती. मात्र लग्नानंतर रिचाने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. संजय दत्त आणि रिचा शर्मा यांचे लग्न झाले. दोघेही सुखी आयुष्य जगत होते.  दोन वर्षांनंतर रिचाला ब्रेन ट्यूमर झाला. ती परदेशात उपचारासाठी गेली. इथल्या त्रासामुळे संजय खूप अस्वस्थ होऊ लागला. याच काळात त्याची माधुरी दीक्षितशी जवळीक वाढू लागली आणि मग रिचा त्याच्या मनातून बाहेर येऊ लागली.

त्या दरम्यान रिचाची तब्येत बरी झाली होती. तिला भारतात  येऊन पुन्हा एकदा संजय दत्तबरोबर  नवीन आयुष्य सुरू करायचं होतं; पण  त्यावेळी सर्व काही बदललं होतं. संजय त्याच्या दुसर्‍या आयुष्यात व्यस्त झाला होता. एका मुलाखतीत रिचाची बहीण एना म्हणाली होती की, संजय दत्त आपल्या पत्नीला विमानतळावर घ्यायलाही आला नव्हता.  रिचाने दोनदा संजयला फोन केला होता. १५ दिवसांनंतर ती पुन्हा न्यूयॉर्कला परतली. तिच्यावरचे  संजयचे प्रेम संपले आणि रिचा हे सहन करू शकली नाही. न्यूयॉर्कला परतल्यानंतर काही दिवसांनी, रिचाला पुन्हा ब्रेन ट्युमर झाला आणि १० डिसेंबर १९९६ रोजी तिचे निधन झाले. त्यावेळी संजय दत्त रिचाबरोबर नव्हता.

तिच्या शेवटच्या क्षणी रिचा संजयला पाहू शकली नाही.  लावण्यात आलेल्या आरोपांवरून संजय म्हणाला होता की, रिचाचे कुटुंब आमच्या वैयक्तिक बाबीत खूप हस्तक्षेप करत असे. संजयने रिचाची बहीण एनाला, त्यांचे संबंध तुटण्याचे सर्वांत मोठे कारण सांगितले. विशेष म्हणजे संजय आणि रिचा यांना  त्रिशाला ही मुलगी असून ती तिच्या आजी-आजोबांसमवेत राहते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER