इंग्लंडविरुध्दचे पहिले दोन कसोटी सामने खेळले जातील प्रेक्षकांविना!

भारत आणि इंग्लंड दरम्यानचे पहीले दोन कसोटी सामने प्रेक्षक आणि मीडिया प्रतिनिधींशिवाय खेळले जातील.चेन्नईतील चेपॉक मैदानावर हे सामने होणार आहेत. ते बंदद्वार खेळले जावेत अशी विनंती इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ECB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) केली आहे.ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे सामने केवळ टेलिव्हिजानवरच बघता येणार आहेत.

पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून होणार आहे आणि कोरोनाच्या स्थितीत फारसा सुधार झालेला नाही. शिवाय आता प्रेक्षक व मीडियाची जैवसुरक्षित व्यवस्था करण्यास फारसा अवधी बीसीसीआय व तामिळनाडू क्रिकेट संघटनेकडे नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीलंकेहून इंग्लंडचा संघ 27 जानेवारी रोजी दाखल होणार आहे. बेन स्टोक्स, मोईन अली आणि इतर सपोर्ट स्टाफ रविवारीच चेन्नईत पोहोचला आहे.भारतीय खेळाडूसुध्दा 27 तारखेलाच दाखल होणार आहेत.

सर्व दाखल होताच त्यांची कोविड- 19 चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर दर तीन दिवसांनी चाचणी करण्यात येणार आहे. संघांचा सराव 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दोन्ही संघ, अधिकारी व सपोर्ट स्टाफसाठी लीला पॕलेस हाॕटेल पूर्णपणे बूक करण्यात आले आहे. या हाॕटेलचे सुरक्षारक्षकसुध्दा बायोबबलमध्ये राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मैदानावर केवळ अधिकृत प्रक्षेपणाचे हक्क असणाऱ्या संस्थेच्या (Official Broadcaster) प्रतिनिधींनाच प्रवेश राहणार आहे. या पथकाची व्यवस्था आयटीसी ग्रँड चोला हाॕटेलच्या एका मजल्यावर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER