आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाले पहिले तीन फलंदाज

Shikhar Dhawan - Ajinkya Rahane - Prithvi Shaw

आयपीएलचा (IPL) मुंबई (MI) आणि दिल्ली दरम्यानचा (DC) क्वालिफायर (Qualifier) सामना अतिशय वेगळा ठरला, तो यासाठी की, या सामन्यात दिल्लीचे पहिले तीन फलंदाज, पृथ्वी शाॕ(Prithvi Shaw), शिखर धवन (Shikhar Dhawan) व अजिंक्य रहाणे (Akinkya Rahane). हे तिन्ही भोपळा न फोडताच बाद झाले आणि दिल्लीच्या फळ्यावर ३ बाद ० अशी धावसंख्या लागली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वांत खराब सुरुवात ठरली.

ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमरा या मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीची भंबेरी उडवली. आयपीएल सामन्यात ३ बाद ० असे पहिल्यांदाच घडले असले तरी पहिले तीन फलंदाज भोपळा न फोडताच माघारी परतण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याच्याआधी २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सवरसुद्धा अशी नामुष्की ओढवली होती आणि त्यावेळी अल्बी मोर्केल व कार्तिक त्यागी या चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांची घसरगुंडी उडवली होती. पण फरक एवढा की यावेळी ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन बळी मिळवले होते तर मोर्केलने दोन षटकां त दोन गडी बाद केले होते.

त्यावेळी मोर्केलने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गिलख्रिस्टला पायचीत बाद केले तर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला झेलबाद करून माघारी धाडले होते. या दोन षटकांदरम्यान त्यागीने हर्शेल गिब्जचा दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळा उडवला होता. यामुळे लक्ष्मण बाद झाला. त्यावेळी डेक्कनची धावसंख्या ३ बाद १ अशी होती. यावेळी मात्र दिल्लीला एकही धाव फळ्यावर न लावताच तीन गडी गमवावे लागले.

ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात पृथ्वी शाॕ व अजिंक्य रहाणेची खेळी संपवली. तर बुमराने दुसऱ्याच षटकात दुसऱ्याच चेंडूवर शिखर धवनचा त्रिफळा उडवला. त्यामुळे ३ बाद ० ही आयपीएलमधील सर्वांत खराब सुरुवात फळ्यावर लागली. याच्याआधी २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सची ३ बाद १ व २०११

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER