कोल्हापुरातील पहिले कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन

S. R. Patil

कोल्हापूर : कोल्हापूरचे पहिले आणि एकमेव कसोटीपटू एस. आर. ऊर्फ सदाशिव रावजी पाटील यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. येथील रुईकर कॉलनीतील निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पाटील यांना २ डिसेंबर १९५५ रोजी मुंबईत झालेल्या न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी लाभली होती. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरच्या वैभवशाली क्रिकेट परंपरेतील एक महान अष्टपैलू खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला आहे. पाटील यांचा जन्म १० ऑक्टोबर १९३३ रोजी पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे झाला.

संस्थानकाळात प्रगतिशील शेतकरी असणाऱ्या रावजी पाटील यांनी आपल्या तिन्ही मुलांना क्रिकेटपटू म्हणून घडविण्यासाठी प्रोत्साहन दिले. एस. आर. पाटील, डी. आर. पाटील, एम. आर. पाटील हे एकाच घरातील तीन भाऊ पुढे मोठे क्रिकेटपटू झाले. एस. आर. पाटील यांनी १९५५ मध्ये एकमेव कसोटीत महाराष्ट्राकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळाची झलक दाखविली. १९५२ ते १९६४ या काळात त्यांनी महाराष्ट्राकडून ३६ सामन्यांत तीन अर्धशतकांसह ८६६ धावा काढल्या. तर गोलंदाजीत ३०.६६ च्या सरासरीने ८३ बळी घेतले. इंग्लिश कौंटी स्पर्धेतही त्यांनी जादू दाखविली. लँकेशायर, नॉर्थ स्टँड फोर्डशायर, नॅन्ट विच या कौंटी क्लबकडून खेळण्याचा बहुमान संपादन केला. पाटील यांनी जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये ३६ वर्षे सेवा बजावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER