युतीच्या दिशेने पहिलं पाऊल; निफाडमध्ये युती, शिवसेनेचा सभापती

Alliance in Niphad

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र पडमवीस (Devendra Fadnavis) यांची बेट गेतल्यानंतर राज्यात पुन्हा युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वास्तविक यावेळी शिवसेनेने विधानसबेत जे पाऊल उचलले त्यानंतर पुन्हा युती शक्य नसल्याच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू होती. मात्र, राऊत – फडणवीस भेटीने पुन्हा युतीच्या आशा बळावताना दििसत आहेत. एवढेच नाही तर, निपाडमध्ये युतीचं पहिलं पाऊलदेखील पडलं आहे. निफाड पंचायत समितीच्या सभापती निवडीत शिवसेना आणि भाजपची युती पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे निफाड पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे संख्याबळ असूनही, भाजपसोबत युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या रत्ना संगमनेरे सभापतीपदी तर भाजपचे संजय शेवाळे उपसभापतीपदी निवड झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यापूर्वी 2017 मध्ये निफाड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न करता स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युती सरकार होतं. मात्र आता चित्र उलट असताना, निफाडमध्ये आधीचीच पुनरावृत्ती दिसत आहे. त्यावेळी 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 10 , भाजप 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि अपक्ष 4 जागांवर विजयी झाले होते.

त्यावेळी अपक्ष सदस्य गुरुदेव कांदे यांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र त्यावेळी भाजपाचे विंचूर गणाचे सदस्य संजय शेवाळे यांनी पाठिंबा दिल्याने, उपसभापतीपदी संधी दिली जाईल असा शब्द माजी आमदार अनिल कदम यांनी दिला होता. तो शब्द अनिल कदम यांनी आज पाळला.

निफाड पंचायत समितीच्या आजच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडीदरम्यान, शिवसेनेच्या शिवडी गणाच्या सदस्या रत्ना संगमनेरे यांची सभापतीपदी तर विंचूर गणाचे सदस्य भाजपाचे संजय शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजप एकमेकांचे कट्टर वैरी अलसल्याचे दाखवत असले तरी, निफाडमध्ये शिवसेना-भाजपाची ही अनोखी युती पाहायला मिळत आहे.

एकीकडे शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवून राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तर दुसरीकडे सहाच महिन्यात शिवसेना भाजपच्या गोटात शिरू पाहत असल्याचे चित्र आहे. भविष्यात पुन्हा शिवसेना भाजप एकत्र येण्याचे हे संकेत असल्याचे दिसते. त्याचे पहिले पाऊल निफाडमध्ये पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER