शरद पवार आणि अमित शहांच्या गुप्त भेटीबाबत राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Amit Shah - Sharad Pawar

मुंबई : २६ मार्चला अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अहमदाबादमध्ये भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती प्रसामाध्यमांमध्ये झळकत आहे. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली आहे. या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली असून, या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button