शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया….

Sheetal Amte

चंद्रपूर :- ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte) यांनी आनंदवनात आत्महत्या केल्याची मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शीतल आमटे यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शीतल आमटे यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण धक्कामध्ये आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही’ असं सांगत त्यांनी पुढे काही बोलण्यास नकार दिला.

डॉ.शीतल आमटे यांनी सोमवारी सकाळी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, शीतल आमटे यांचा अपघाती मृत्यु अशी पोलिसांनी नोंद केल्याची माहिती आहे. तसेच, शीतल यांच्या मृत्युच्या चौकशीसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?; शिवसेनेची अग्रलेखातून भावनिक प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER