सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रूथ’चा फर्स्ट लुक आला समोर

Salman Khan

‘अंतिम: द फाइनल ट्रूथ’ या चित्रपटातला सलमान खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सलमान खानच्या (Salman Khan) फर्स्ट लूकचा एक व्हिडिओ त्याचा इंस्टाग्रामवर त्याचा मेव्हणा आयुष शर्माने शेअर केला आहे. या चित्रपटात दबंग खान शीख सिपाहीच्या भूमिकेत आहे.

व्हिडिओ पोस्ट करताना आयुष शर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- ‘अंतिम की शुरुआत.’ यासह त्याने हॅशटॅगमध्ये लिहिले – ‘भाई का फर्स्ट लुक.’ व्हिडिओमध्ये सलमान खानने निळ्या रंगाच्या टी-शर्टसह करड्या (Grey) रंगाची पँट परिधान केली आहे. तसेच काळ्या पगडी आणि खालसाचे लॉकेट परिधान करून तो भाजी मार्केटमधून जाताना दिसत आहे.

या वृत्तानुसार या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून पुण्यात सुरू झाले होते. तोपर्यंत केवळ आयुष शर्मा शूटिंग करत होता. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आयुष शर्माच्या दृश्यांसह चित्रपटाची सुरूवात केली आणि २० दिवसांच्या वेळापत्रकानंतर सलमान खाननेही रविवारपासून मुंबई फिल्म सिटीमध्ये शूटिंग सुरू केली.

चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात सलमान खान विस्तारीत कॅमिओ करणार होता, पण पटकथा बदलल्यानंतर आता या चित्रपटात सलमानचे पूर्ण पात्र आहे. या चित्रपटामध्ये सलमान एका शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे, जो माफिया राज संपवून टोळीचे युद्ध संपवण्यासाठी काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चित्रपटात सलमानचा अवतारही पूर्णपणे वेगळा दिसणार आहे.

आयुष शर्माची व्यक्तिरेखा या सिनेमातील एका गुंडाची असेल, जो सलमानशी टक्कर घेणार आहे. या चित्रपटात सलमान आणि आयुष व्यतिरिक्त निकितिन धीर मुख्य भूमिकेत आहेत. ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ (Final: The Final Truth)हा मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER