‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा समोर आला पहिला लूक; काजळ लावताना दिसला अक्षय

Laxmmi Bomb

अक्षयकुमार (Akshay Kumar) त्याच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) चित्रपटासाठी चर्चेत आहे. यापूर्वी आपण कधीही न पाहिलेला या चित्रपटात त्याचा अवतार दिसेल. आता या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. अक्षयचं पोस्टर शेअर होताच ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय काजळ लावताना दिसत आहे. चित्रपटाचे पहिले पोस्ट शेअर करत अक्षयने लिहिले की, ‘कथेचा एक बॉम्ब तुमच्यासाठी येत आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीचीही भूमिका आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’बद्दल बोलायचे झाले तर हा साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. नुकतेच असे वृत्त आले होते की, अक्षय एका व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारणार आहे, ज्याच्यावर या चित्रपटात ट्रान्सजेंडर भुताचा साया असेल.

‘कंचना’चे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले होते आणि त्याचा रिमेकदेखील ते स्वतःच दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाची निर्मिती शबीना एंटरटेनमेंट आणि तुषार एंटरटेनमेंट हाऊस अंतर्गत केली जात आहे. चित्रपटात कियारा अडवाणी अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER