हिंदूत्त्वाची पहिली प्रयोगशाळा गुजरात नसून ८९ ची मुंबईतल्या विलेपार्लेची पोटनिवडणूक होती!

Maharashtra Today

भारताच्या राजकारणात अनेक राजकीय प्रयोग झाले. अनेक पक्ष बनले आणि विसर्जितही झाले. भारताच्या राजकारणाला ७० च्या दशकातील उत्तरार्धात ‘हिंदूत्त्वानं’ (Hindutav)भुरळ घातली आणि हा समान दुआ पकडून शिवसेना आणि भाजप एकत्र आले; परंतू हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य होईल दोघांच्याही राजकारणाची सुरुवातीला हिंदूत्त्वाचा विशेष काहीसा आधार नव्हता. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि भ्रष्टाराचा मुद्दा उचलून कॉंग्रेसला(Congress) टक्कर देणारं जनता दल जे परत भाजप झालं या दोघांना हिंदूत्त्वाच्या वाटेवर आणलं काश्मिरनं.

काश्मिरचा मुद्दा आणि ब्रिटनमधलं अपहरण

इंदिरा गांधींनी(Indira Gandhi) भारतात आणबाणी लादल्यानंतर काळ, वर्ष १९८४, इंदिरांची हत्या झाली. आणीबाणीला पाठिंबा दिल्यामुळं जनतेनं बाळासाहेबांचा पाठिंबा काढून घ्यायला सुरुवात केली होती. ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात बाळासाहेबांवर ‘कागदी वाघ’ अशी टीका होऊ लागली. त्याकाळात शिवसेना(Shivsena) राजकीय उभारी घेण्यासाठी मजबूत विचाराच्या शोधात होती. शिवसेनेनं मराठी मुद्द्यावर चांगला डाव खेळला होता. मुंबई मनपा जिंकली होती. आता तो मुद्दा जवळपास निकालात निघाल्याचं चित्रं होतं.

या सर्व कोड्याला कलाटणी दिली ती भारतापासून हजारो मैल दुर असलेल्या ब्रिटनमध्ये झालेल्या एका अपहरणानं. फेब्रुवारी १९८४ ला ब्रिटनच्या बर्मिंघममध्ये भारतीय राजदूत ‘रविंद्र म्हात्रे’ यांच अपहरण झालं. कार्यालायातून घरी जात असताना त्यांच अपहरण करण्यात आलं. हे खंडणीसाठी झालेलं अपहरण नव्हतं. या घटनेला घडवून आणलं होतं, ‘काश्मिर लिब्रेशन आर्मी’ या संघटनेनं. १९७१ ला एअर इंडीयाचं अपहरण करणाऱ्या मकबुल भट्टच्या सुटकेसाठी म्हात्रेंच अपहरण करण्यात आलं. यानंतर ३ च दिवसात त्यांची हत्या करण्यात आली. इंदिरा गांधींनी मकबुलला फाशी दिली.

बाळासाहेबांनी वेळ साधली

शिवसेनेच्या राजकारणालाप पुढची दिशा देण्यासाठी नव्या मुद्द्याच्या शोधा असलेल्या बाळासाहेबांची प्रतिक्षा या बातमीसह संपली. त्यांनी मराठी माणूस आणि मुस्लीमविरोधी राजकारणाला हिंदूत्त्वाच्या धाग्यात ओवलं. मराठी माणसासोबत हिंदूत्त्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना पहिल्यांदा पुढं आली असं मतं जेष्ठ पत्रकार सुजाता आनंदन त्यांच्या पुस्तकातून व्यक्त करतात.

हिंदूत्त्वाचा मुद्दा आणि युती

सामनाच्या संपादकीय पानावरुन वारंवार हिंदूत्त्वाची मांडणी होऊ लागली. हा मुद्दा जनमत आपल्याकडे खेचू शकतो का? हे तपासणं शिवसेनेसाठी महत्त्वाचं बनत चाललं होतं. याची संधी सेनेला मिळाली एप्रिल १९८९ मध्ये. विलेपार्ले पोट निवडणूकीत बाळासाहेबांनी हिंदूत्त्वाचा मुद्दा प्रखर्शाने मांडला. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदूत्त्वाला केंद्रस्थानी ठेऊन प्रचार सुरु होता. कॉंग्रेसच्या प्रभाकर कुंटेंचा पराभव झाला आणि शिवसेनेला एक आमदार आणि सोबतच पुढच्या राजकारणाचा मार्ग मिळाला जो त्यांना भाजपच्या(BJP) दिशेने नेणार होता.

हिंदूत्त्वाची पहिली प्रयोगशाळा गुजरात नसून विलेपार्ले असल्याचं अनेक जण सांगतात. निवडणूकी दरम्यान बाळासाहेबांनी केलेल्या जहाल भाषणांवर फारसं लक्ष देण्यात आलं नाही. कॉंग्रेसाला विलेपार्ले जिंकण्याची खात्री होती शिवाय जनता अशा द्वेषपुर्ण विचारांना समर्थन देणार नाही हा देखील कॉंग्रेसी नेत्यांचा समज होता तो निवडणूकीच्या निकालानं खोटा ठरवला. पराभूत कुंटेंनी कोर्टाची पायरी चढली. विलेपार्लेच्या निवडणूकीत भाजपचा पाठिंबा जनसंघाला होता. तोपर्यंत हिंदूत्त्वाचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर नव्हता.

शिवसेनेच्या विजयानंतर मात्र हिंदूत्त्वाची राजकीय व्याप्ती आणि त्याआधारे शक्य असलेलं जनमत परिवर्तनाबद्दलची खात्री नंतरच्या काळात भाजपला झाली. भाजपलाही ठोस भूमिका घेण्यासाठी वाजवी मुद्द्याची गरज होती. ती गरज राममंदिराच्या मुद्दा हातात घेतल्यानंतर पुर्ण झाली. १९८९च्या भाजपच्या पालनपुर अधिवेशनात संमिश्र प्रतिक्रिया आल्या परंतू भाजपानं हिंदूत्त्वाला कवटाळण्याची तयारी दर्शवली.

यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी बाळासाहेबांची भेटगाठ घेण्याचं सत्र सुरु केलं. परिणाम स्वरुप दोन्ही पक्षात युती झाली. यात प्रमोद महाजनांनी महत्त्वपुर्ण भूमिका निभावली. बाळासाहेबांचा लहरीपणा सांभाळण्यापासून दोन्ही पक्षांचा एकाच दिशेनं नेण्यात त्यांनी भूमिका महत्त्वपुर्ण होती. युती झाल्यानंतर बाळासाहेबांचा योग्य आदर राखला जाईल ही जबाबदारी महाजन यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. असं राजकीय विश्लेष्क सांगतात.

मराठवाड्यातला असंतोष कधीच मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहचत नव्हता. ते पोहचवण्याचं काम शिवसेना भाजप युतीनं केलं. मराठवाड्यातल्या जातीवादी समीकरणाला छेद देत निझामाच्या राज्यात हालअपेष्टा सहन करणाऱ्या जनतेला हिंदूत्व हा मुद्दा जात विसरायला लावणारा वाटला. १९९०च्या विधासभेत याचा फायदा झाला. मुंडेंनी शरद पवारांच्या निर्विवाद वर्चस्वाला आव्हान दिलं, सत्ता आली नाही परंतू विरोधी पक्ष मिळालं. मुंडेंनी ती जाबबदारी लिलया पेलली. यानंतर ९२ ला बाबरी मश्जिद पडली आणि मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट यानंतर शिवसेना- भाजप १९९५ला सत्तेत आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button