आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात लहान मुलांसाठीचे पहिले जम्बो कोविड सेंटर; ७० टक्के ऑक्सिजन बेड्स, २०० आयसीयू बेड्सची सुविधा

Aaditya Thackeray - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुले, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने (Thackeray Government) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे .कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हेच मत लक्षात घेऊन मुंबईत ५०० खाटांचे लहान मुलांसाठी स्वतंत्र जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे.

यात एक वर्षापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना दाखल केले जाणार आहे. या लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यात ७० टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर २०० अतिदक्षता विभागातील खाटा असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button