रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसींची पहिली खेप भारतात; हैदराबादला विमान पोहचले

Russian Sputnik-V vaccines arrived in India - Maharashtra Today

हैदराबाद : देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात नागरिकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी देण्यात येत आहेत. दरम्यान, देशात लसींची कमतरता जाणवत असल्याने भारताने रशियाकडून स्पुतनिक-व्ही या लसींचा साठा मागवला असून या लसींची पहिली खेप भारतात आली आहे. दीड लाख स्पुतनिक-व्ही लसीचे डोस भारतात आणले असून हैदराबाद विमानतळावर लसी घेऊन आलेले विमान उतरले आहे. रशियाकडून या महिन्यात भारताला आणखी ३० लाख लसी मिळणार आहेत.

स्पुतनिक-व्ही लस डॉ. रेड्डी यांच्या लॅबोरेटरीजमध्ये पाठवण्यात येणार आहे. १३ एप्रिल रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुतनिक-व्हीच्या इमर्जन्सी वापरण्यास मंजुरी दिली आहे. स्पुतनिक-व्हीला मंजुरी देणारा भारत हा जगातील ६० वा देश बनला आहे. आजपासूनच देशात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. स्पुतनिक-व्ही भारतात पोहचल्यानं या मोहिमेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतानं स्पुतनिक-व्ही या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. स्पुतनिक-व्ही ही लस ९१.६ टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. ती अमेरिकेत बनवलेल्या फायझर आणि मॉडर्ना या लसींमध्ये आतापर्यंत केवळ ९० टक्के प्रभावित दिसून आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button